About Me

About Me

नमस्कार वाचकहो मी सोनल विजय मांगेला नारिंगी गावात राहते मात्र एकही गोष्ट इथे नारिंगी रंगाची असलेली मी पाहिली नाही मी कोणी मोठी लेखिका अथवा कवी नाही खरतर मलाच कधी वाटलं नव्हतं की मी सुद्धा काही लिहू शकेन म्हणूनच माझ्या संपंर्कातले काही जण मी लिहिलेल्या गोष्टीची खात्री पटवून घेतात असो.लिहिणं मला खूप आवडत मला वाटत लिखाणातून मनातले सारेच कवडसे थेट स्वच्छंदी शुभ्र कागदावर येऊन ठेपतात कारण तेथे कुठलेही धूलिकण नसतात ना कुठले ऊन असते फक्त असतो तो दुआ विचारांचा आणि विचार करायला भाग पाडणाऱ्यांचा लिखाणातून मला कमालीचं समाधान मिळत आणि आनंद त्याहून अधिक आणि म्हणूनच माझं हे छोट मोठं लिहण अविरत सुरू ठेवीन.

थोडस माझ्याबद्दल च माझी रास कुंभ तर आहे मात्र अजून ही कधी कुंभकर्ण सारखी झोपून राहिलेली मला आठवत नाही .वेगवेगळं जिन्नस बनवणं माझा छंदचं मात्र अजूनही मला गोल चपाती बनवता येत नाही संपूर्ण जग नाही मात्र काही निवडक ठिकाण भटकायची आहेत मात्र मुंबईबाहेर जाण्याचा योग अजून आलेला नाही.पैसे साठवण्याचा छंद अगदी लहानपणापासून चा मात्र एवढी मोठी झाले तरी बँकेचं पासबुक पूर्ण भरून नवीन घ्यायचा योग आला नाही. साडी नेसायला आवडत आणि त्याहून दुसरीने घातलेली पहायला प्रचंड आवडत. असो मला आशा आहे माझे लेख कविता तुम्हां आवडतील लिखाण हे एका मोरासारखे सुंदर आहे तो कसा पिसारा फुलवून सगळ्या ना स्वतःकडे आकर्षित करतो आणि सर्वांचा ओठावर हसू फुलवतो तसच अगदी लिखाणाच ही आहे एखाद्याच मन फुलवण्याचं काम.